एक दीर्घ श्वास. दोन श्वासांमधला किंचित अस्वस्थ हुंकार.
मणक्यात साचून राहिलेली कळ.
Pandora’s box उघडताना वार्यावर भरकटलेली दोन-तीन आळशी पत्रं.
होकारा- नकाराच्या ओळी मोजत मी घेतलेल्या गिरक्या.
आणि मग अचानक काहीतरी सुचतं.
Shining stars cry middle in your dreams
Wake up. Whistle.
Don’t let them cry when you are asleep.
पत्राच्या सुरुवातीलाच अडखळलेले शब्द हळूहळू आपली वाट शोधतात.
मध्येच कुठेतरी उगाचच पावसाचं गाणं आठवतं.
मी आणि माझ्या स्वप्नात आता फ़क्त एका मृदगंधाच्या सरीचं अंतर.
मणक्यातली कळ हळूहळू मावळतीकडे विरत जाते.
अंधार कोसळ कोसळतोय.
एक पंख तुटलेल्या पक्षाचा दुसरा पंख पांघरुन मला झोपी जायचंय.
