Saturday, October 9, 2010

मी आणि मीच फक्त ....


काहीही वाटण्याच्या कितीही त-हा असू शकतात.
मुंब्र्याचा डोंगर बोगद्यात अदृश होतो, झोपडपट्टीतून एखादाच नारिंगी पतंग छतांवर भिरभिरताना दिसतो, धुराचा खाडीचा वास श्वासात मिसळून आपलं ठळक अस्तित्व जाणवून देतो, 
ट्रेनला रुळांचं भान सुटलंय् आणि ती कधीही आपल्याला हवी तशी धावेल असं वाटत राहतं.
आपण कुठे चाललोय त्याचा विचार करणं अनावश्यक वाटू लागतं एकाएकी.
ट्रेन सोबत सरकणारं शरीर आपलं नसावच इतकं हलकं होतं आणि त्याचवेळी बधीर जड.
कसला विचार करावा ? 
रस्त्यांचा ? 
कानात वाजणा-या कबीराचा ? 
मेंदूत धावणा-या अतिसुक्ष्म वेदनेचा ? 
कानशीलावर ओघळलेल्या एखाद्याच थेंबाचा ? 
घरांचं अस्तित्व दाखवणा-या ठिपक्या ठिपक्या एवढ्या दिव्यांचा ? 
तुझा ? 
माझा ? 
त्यांचा ? 
सगळ्या जगाचा ? 
मांजराचा ? 
रस्त्याच्या कडेला दिसलेल्या एकट्या गाढवाचा ? 
त्याला कळलं असेल का एकटेपण ? 
जाणवलं असेल का ? 
नाही कळलं एकटेपण मग काय होतं ? 
कुणी आहे का या समस्त भूतलावर एकटेपण कळल्यावर तगलेलं ? 
सर्वार्थाने तगलेलं ? 
टिकलेलं ? 
आहे का कुणी ? 
असेल का कुणी ?
स्टेशन येतं.
गर्दी सोबत मी वाहत जाते.
ओळखीच्या प्लैटफौर्म वर अनोळखी प्रवास सुरु होतो एका नव्या रात्रींच्या दिशेने ............

Sunday, September 5, 2010

??????


कधीतरी अशी वेळ येते जेव्हा आयुष्य तुम्हाला हाक मारतं.
बदलासाठी.
बदलांसाठी विस्तारत असतानाच बदल होऊन जातात.
आधीच.
आणि मग तुमच्या लक्षात येतं अचानक की गारठा फ़ार वाढायला लागलाय.
आणि घराला दारं नाहीत. बंद करता येण्याजोगी.
तुम्ही गोठत जाता घराच्या कोपर्‍यात.
दुखवत राहतं अस्तित्व स्वतःचं.
तुम्ही किंचाळता.हसता.मावायचा प्रयत्न करता.
काहीही कारण नसताना काळ पुढे सरकत असतो.
स्वप्नांमध्ये कुणीतरी अखंड धावत असतं सैरावैरा.
पण तुम्ही चेहरा नाही पाहू शकत.
ती वेगवान सावली व्यापून टाकते नीज.
गारठा वाढत जातो.
अमर्याद.


Sunday, August 22, 2010

Knight in the dark


There is a poet.
Who doesn’t know anything about poems.
Neither do I.
But he writes.
So do I.
He starts from a question.
For which he looks at me for an answer.
I wait for him to get depressed.
That way I can build some more reasons.
He talks of winds.
Not much of storms.
He thinks about escape.
Not much about exit.
I wish to break him in pieces.
So I can paint every piece with blue.
He won’t mind blue I think.
He is color blind.

Monday, August 16, 2010

UFOs






I am waiting for things to be clear enough so I can hear them.
Without doubt. Without questions.
Interpretation is not my problem. It never was.
But am I hearing the same thing I think I am hearing?
How can I be sure of it?
Horizons always have seemed real to me.
But they weren’t. Never.
I knew that much about them.
Why knowing and feeling are different?

Faith has not safe place around me.
It’s better than holding on to it and failing every time like never before.

Everything is so bright.
Even twilight is so bright that I can’t see it clearly anymore.
Some broken promises keep shouting in head.
Some worlds are scattered in unkind way.
Will they find their way to destruction peacefully?
I just don’t know.


Sunday, August 15, 2010

Doris Day-Que Sera Sera



भीती वाटतेय स्वत:च्या निरनिराळ्या चेहर्‍यांची.
माणसांची. आजुबाजूच्या भवतालाची.
जगण्यातून काही सापडो किंवा न सापडो.
पण ते अस्तित्वातच नसावं ची भीती छातीत वाजत राहते.सदोदित.
न्याय आहे? नसावा बहुधा.
भीती असावी. असुरक्षितता असावी.त्रागा असावा. संतापही.
आणि खूपसे प्रश्न असावेत. सुरुवातीपासून शेवटापर्यंत.
मग मी कुठाय या सार्‍यात?
खरंच आहे का?
की हरवून जाणं आहे नुसतं?
आयुष्याविषयी वगैरे बोलू नये वाटतं.
आपण त्याचं अवमूल्यन करतोय असं वाटत राहतं.
कसले उसासे..नि कसले सुस्कारे.
त्याहून ही काहीतरी मोठ्ठं हातून सुटून गेलंय.
पुन्हा कुठल्या रस्त्यावर सापडेल नाही ठाऊक.
किंवा सापडेल की नाही ते ही नाही ठाऊक.
सध्यातरी एवढंच.


When I was just a little girl
I asked my mother 
What will I be?
Will I be pretty?
Will I be rich?
Here's what she said to me:


Que sera, sera.
Whatever will be, will be.
The future's not ours to see.
Que sera, sera.
What will be, will be.


When I grew up and fell in love
I asked my sweetheart 
What lies ahead?
Will we have rainbows
Day after day?
Here's what my sweetheart said:


Que sera, sera.
Whatever will be, will be.
The future's not ours to see.
Que sera, sera.
What will be, will be.


Now I have children of my own.
They ask their mother,
What will I be?
Will I be handsome?
Will I be rich?
I tell them tenderly:


Que sera, sera.
Whatever will be, will be.
The future's not ours to see.
Que sera, sera.
What will be, will be.
Que sera, sera.

Sunday, August 8, 2010

बोन्साय आणि काही विरामचिन्हं





एका भकास दुपारी रात्रीच्या अपुर्‍या झोपेचा कोटा पूर्ण करुन उठताना
जन्मलेले दोन बेवारस प्रश्न:

दुनियेतल्या समस्त धर्मग्रंथांना एकत्र आग लावली
तर एखाद्या तरी जिवंत प्रार्थनेचा धूर निघेल का?

आणि ,

तासा- तासागणिक मरत जाणार्‍या श्रद्धेच्या चिता
दरवेळी कशाने सजवायच्या?

उत्तर: दोन निनावी जांभया आणि पांघरुणांवरुन झटकलेली धूळ.

प्रेम...माया...करुणा...तत्वं...नाती.
या सार्‍यांच्या औरसपणावर ठळक उभ्या राहिलेल्या प्रश्नचिन्हांच्या
सरळ-वाकड्या गल्ल्यांमधून,
गोंधळवून टाकणार्‍या अंधार्‍या कोनाड्यांतूनही
हमखास हाताशी लागणार्‍या अश्रद्धेच्या आधारावर
काही खेळ मांडावेत.
सोबतीला घ्यावेत
काही झुकलेल्या खांद्यांचे, वाकलेल्या कण्याचे खेळगडी.
प्रेमाचे खेळ.मायेचे खेळ.नात्यांचे खेळ. तत्वज्ञानांचे खेळ.
नियम बनवावेत दुबळ्या मनगटाच्या जिवावर.
नियम वाकवावेत, मोडावेत, बदलावेत आपापल्या सोयींच्या जिवावर.
नियमांशी खेळता नाही आलं तर खेळगडी बदलावेत.
अगदीच जमलं नाही तर खेळ बदलून पाहावा.
जतन करुन ठेवावीत कलेवरं समस्त तत्वज्ञानांची
खेळाच्या अस्सलपणाचे पुरावे म्हणून.

पुन्हा एकदा 
कुठल्याशा भकास दुपारी
कुठल्यातरी मृत प्रश्नांच्या उत्तरादाखल
आपलेसे करावेत काही पुळचट युक्तीवाद.
आणि
करुन ठेवावी अजाणपणे
आपल्याच कुठल्यातरी निर्दोष वंशजाच्या काटछाटीची तरतूद.
कुणातरी निष्पाप वंशजाच्या घुसमटीची तरतूद.

Thursday, August 5, 2010

Let it be...




There can be certain age when you feel you can bring the change.
Change the world etc.
You promote your egos. Play your own blame games.
See dreams of light. Run behind mirage.
You feel this is ‘your’ territory.
But more of this age is passing through me, more I am feeling that world changes itself everyday. And it changes you too with it.
Realizations keep on changing.
You get exhausted searching the ultimate realization to rest.
More you say “I am doing it”, more world removes your illusion about it.
Your egos. Your blame games sound worthless to yourself.
You love because you love the feeling that “I love”.
You hate because may be it makes you feel better or worse of yourself.
You come to know that world is doing it to you what you call ‘I do’.
And suddenly it means nothing.
Anger. Hatred. Love. Ego. Blaming others.
All you learn is to let the world  be. Let the change be. Let yourself be. 

Tuesday, August 3, 2010

Memories unleashed





Above the lonely skies
There rest some stories.
Stories of light around me.
Stories of darkness around the light .

When  dancing with strangers,
I wake up in different worlds.
I  search for the face I know.
I hear the stories they sing.

When lost in dark narrow valleys
I see cold flames of my anger
Empty pages burn into silence
Stories turn red into dreams.

I wait for stories to be true.
I wait for stories to have colors
They will end someday .
They were breathing someday.

Sunday, July 25, 2010

काही घाव..नव्याने कुरतडलेले




हम ने माना के तगाफ़ुल ना करोगे लेकिन,
खाक हो जायेंगे हम, तुम को खबर होने तक....

नको...सगळा आकांत नाही सोसवणार...
पण आकांताची झलक चालेल...
त्वचेला जाणवेल न जाणवेलशी....
चवीपुरते रोमांच आणणारी.....
उसासे सोडण्यासाठी पुरेलशी...
लिखाणासाठी उत्तेजित करेल एवढी.....आणि तेवढीच....
त्याहून नको...
अंग पोळणारी नको....
हाडांमध्ये मुरणारी...स्नायू पिळवटून टाकणारी वेदना नको...
मस्तकात भिनणारी कळ नको....
कडेकडेने येणारा दुःखाचा अंदाज घेत त्याचं भांडवल करायचं...

ऎकतोयस ना गालिब?
तुझ्याच जिवावर तर दुःखाचे महाल उभारले आम्ही...
मैफ़िली सजवल्या..
एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून नजरेने दिलासे पुरवले...
काय केलं नेमकं माहिताय?
ती अंधारी खोली टाळलीच........
कारण प्रत्येकाची खोली निरनिराळी...
तिथे घोळक्याने नाही जाता येत.....

केलं ते फ़क्त खिडकीतून डोकावणं....
बाहेरच्या झगमगाटाला हाताशी धरुन.....
गाफ़िल नजरांनी बेफ़िकिरीचा चष्मा चढवला.....
आपापली सार्वजनिक वर्तुळं आखली अन् सीमा सुरक्षित केल्या...
वर्तुळंच का म्हणशील तर कोपरे टाळले....अंधार टाळला....
सगळ्या वर्तुळांना घेरून असणारा अंधार आम्ही वर्तुळं आखून टाळला...

तुझ्या निमित्ताने हा आणखी एक उमाळा सार्वजनिक केला....
आणखी बेडौल हातवारे दुःखाची जाणीव दर्शवण्यासाठी.....

पण तू मात्र म्हणतच राहशील ना....

जब की तुझ बिन नही कोई मौजुद...
फ़िर ये हंगामा, ऎ खुदा क्या है..?
..................?

Saturday, July 24, 2010

Road to lost moment...

I am out. Out on the road.
I am going somewhere.
I look at the things. Things those are passing me. or vice versa.
It's just matter of way you're looking at it.
Things.
Beautiful things.
Strange things.
Ironic things.
Simple things.
Simple things sometimes make most beautiful sight.
All these things amaze me.
It's more than that.
I feel different.
The moment I see all these things, there emerges a new memory in my nerves.
And it's You.
Then I can't breathe anymore. Everything stops.
Then You start to feel these vibrating moments with me.
With my eyes. With my nose. With my skin. With my ears. With all my senses.
And I get my third eye.
You are my third eye.


I see a boy with school bag. Sitting on a bench.
He may not be waiting for school bus.
Rather he is not.
Because this is a very small village I am passing by. Here doesn't come a school bus.
But he seems just like "Forest Gump".
Boy sitting on a bench forever. Waiting for something forever.


Everything changes in just few kilometers.
Outfits. Languages. Lifestyles.
But they laugh same.
They bargain same.
They look at me in same strange way.


You are curious about everything.
Your eyes are full of that cheering curiosity.
I remember those eyes when look at these things.


Don't jump on the conclusions that I miss you.
I don't much in these days.
I am turning inside.
Inside, everything looks strange. New. Frightening. Lonely.
I'm getting used to it.
There is whole other world without you.
It's big.
And when I get lost in it, something happens.
Outside things look like photo prints. Not much alive. But attractive.
They give you news of beauty, anger, selfishness, hunger, wealth.etc.
But they don't seem to reach to me.


Though I am out on the road, there are so many roads those are not out of me.
I am bound to these roads.
Roads I don't know anything about........