कधीतरी अशी वेळ येते जेव्हा आयुष्य तुम्हाला हाक मारतं.
बदलासाठी.
बदलांसाठी विस्तारत असतानाच बदल होऊन जातात.
आधीच.
आणि मग तुमच्या लक्षात येतं अचानक की गारठा फ़ार वाढायला लागलाय.
आणि घराला दारं नाहीत. बंद करता येण्याजोगी.
तुम्ही गोठत जाता घराच्या कोपर्यात.
दुखवत राहतं अस्तित्व स्वतःचं.
तुम्ही किंचाळता.हसता.मावायचा प्रयत्न करता.
काहीही कारण नसताना काळ पुढे सरकत असतो.
स्वप्नांमध्ये कुणीतरी अखंड धावत असतं सैरावैरा.
पण तुम्ही चेहरा नाही पाहू शकत.
ती वेगवान सावली व्यापून टाकते नीज.
गारठा वाढत जातो.
अमर्याद.

Liked the posts
ReplyDelete:-)
It seems silly now. :)
ReplyDelete